मोहरम निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप

0
19

चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्गावर दर्शनासाठी येणा-या भक्तांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रमूखतेने उपस्थित राहून शरबत वाटप केले.

हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामूळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दशमीला या दोन दिवसाकरीता चंद्रपूरातील कारागृहात असलेल्या हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो यंदाही कारागृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे पोहचलेल्या हजारो भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सलिम शेख, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, सोशल मिडिया संयोजक करणसिंग बैस, युवा नेते ताहिर हुसेन, महेश गहुकर, मुन्ना जोगी, अबरार शेख, अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर प्रमूख कौसर खान, विमल काटकर, आशु फुलझेले, शमा काजी, माधुरी निवलकर, मुकेश गाडगे, शंकर दंतुलवार, सुरेंद्र अंचल, शुभम येनगंटीवार, राकेश रापेल्लीवार, प्रकाश ईलटम, फैजान कुरेशी, शुभम चिंचोळकर, चिरंजिवी, रिजू शेख, केतन सोगे आदींची उपस्थिती होती.

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here