========≈=========
दिनांक २६/०८/२०२२रोजी अमराई वार्ड क्र.०१ इथे वे.को.ली. वणी क्षेत्र,घुग्घुसच्या चुकीमुळे गजानन मडावी यांचा राहता घरी अंदाजे 70 फूट खड्डा पडला चौकशीमध्ये असं पाहण्यात आले की वे.को.ली द्वारा अंडरग्राउंड माईन्स मध्ये सेंड फिलिंग करतांना भोंगळ कारभार झाला होता आणि याच कारना मुळे खड्डा पडला. या खड्ड्या मुळे मडावी यांचे घर संपूर्ण सामान सोबत आत गेले आणि मालमत्तेची नुकसान झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरभाऊ जोरगेवार व वेकोली प्रशासनाचे उच्च अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी केली व या सर्वांनी या नुकसानीचा मोबदला देण्यात येईलच अशी मोठमोठी आश्वासने दिली होती
त्यानंतर
सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामा मा. तहसील कार्यालय चंद्रपूर आणि नगरपरिषद घुग्घुस मार्फत करण्यात आले होते, ०१ वर्ष लोटून गेले पण मडावी कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा मोबदला व आर्थिक मदत मिळाली नाही
नावापुरते यांना वेकोली च्या क्वार्टरवर स्थानांतरीत करण्यात आले त्यानंतर कुटुंब शासन प्रशासनाकडे आशेची किरण केव्हा उगवेल याचीच वाट बघत आहे असे कुठपर्यंत चालणार याचे उत्तर या सर्व मोठ्या नेत्यांनी द्यावेत,सध्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे चुकी वेकोली प्रशासनाची व सरकारची पण त्रास भोगतोय सर्वसामान्य गरीब माणूस.
असल्या प्रकारची जनतेची भुलवन व फसवेगिरी आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही
यासाठी आम आदमी पार्टी तर्फे शासन-प्रशासनाला नम्र विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर मडावी कुटुंबांना त्यांचा मालमत्तेचा हक्क म्हणजेच मोबदला मिळावा अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे जनआंदोलन करण्यात येईल. यावेळेस चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मयूरजी रायकवर ,चंद्रपूर जिल्हा संघटनमंत्री भिवराजजी सोनी नेते सुनीलजी मुसळे ,चंद्रपूर शहर सचिव राजूजी कुडे शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, सहसचिव , सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
====================
*”हँलोसंपादक :- शशी ठक्कर 9881277793 चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========≈===========
संपादक :- शशी ठक्कर 9881277793