Home
Home चंद्रपूर *राष्ट्रीय खेळाडू तनू सुनिल आडे च्या आफ्रोट संघटनेच्या वतीने सन्मान ….*

*राष्ट्रीय खेळाडू तनू सुनिल आडे च्या आफ्रोट संघटनेच्या वतीने सन्मान ….*

0
98

=======================

*आर्गनायजेशन फॉर राइटस् ऑफ ट्रायबल ही संघटना नेहमीच समाजाच्या भविष्याचा विचार करून कार्य करीत आहे. समाजासाठी शिक्षण, रोजगार व आरोग्य या आवश्यक बाबीचा विचार करून यावर निरंतरपणे कार्य करीत असून संघटनेच्या अथक प्रयत्नाने यामध्ये काही प्रमाणात यशस्वीता देखील प्राप्त झालेली आहे. आदिवासी तरुणांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आफ्रोट संघटना नेहमीच अग्रेसर राहीलेलीआहे. काही दिवसापुर्विच पोंभुर्णा तालुक्यात राहणारा सोहन उईके याला आफ्रोट फाऊंडेशन च्या माध्यमातून पन्नास हजाराची मुदत ठेव करुन दिली. ही प्रेरणादायी संकल्पना हेरून जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती ची विद्यार्थिनी तनू सुनिल आडे रा. कुरूडा ता. भद्रावती जि. चंद्रपूर या मुलीने आपल्या अलौकीक इच्छाशक्तीच्या बळावर “लाठीकाठी” या खेळप्रकारात तामीळनाडू मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय खेळात तनू सुनिल आडे या मुलीने अतुलनिय खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय स्तरावर “कास्य” पदक प्राप्त केले. ही समाजासाठी अभिमानाची व भुषनावह बाब असून तनु चा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व खेळाबाबत माहीती जाणून घेण्यासाठी आफ्रोट चंद्रपूरचे अध्यक्ष विजय कुमरे, सचिव शंकर मडावी व संघटनेचे संघटक मा.सुनिल गेडाम सर यानी तनू सुनिल आडे यांचे घरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. पुढील भविष्यकालीन वाटचालीसाठी चर्चा करून आफ्रोट संघटना सदैव सोबत राहुन सहकार्य करण्यासाठी सक्षम आहे असा विश्वास देऊन शुभेच्छा दिल्या.*

========================

*तनु आडे हिच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आफ्रोट परीवाराकडून मनःपुर्वक शुभेच्छा….!*.
🌹🌹🌹🌹👍👍👍🌹🌹🌹🌹 

=================÷=====

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

=====≈=============÷÷÷

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here