धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बौध्द अनुयायांसाठी यंग चांदा ब्रिगेड तर्फे पुरी भाजी ची व्यवस्था हजारो अनुयायांनी घेतला पुरी भाजीचा लाभ

0
19

===================

67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभुमीवर हजारोच्या संख्येने जमलेल्या बौद्ध अनुयायांसाठी यंग चांदा ब्रिगेडतर्फे पुरी भाजी ची व्यवस्था करण्यात आली. यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिक्षाभुमी परिसरात पुरीभाजी वाटप स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी हजारो अनुयायांनी पुरी भाजीचा लाभ घेतला.
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहराध्यक्ष वंदना हातगावकर, बहुजन आघाडीच्या महिला शहर अध्यक्षा विमल कातकर, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, देवा कुंठा, आनंद रनशूल, कल्पना शिंदे, शमा काझी, अस्मिता दोनारकर, आशा देशमुख,अनिता झाडे, शांता धांडे, प्रशांत रोहनकर, बबलू मेश्राम, सतनाम मिर्धा, कार्तिक बोरेवार, ऋषभ दुपारे, दत्तू गवड़ी आदिंची उपस्थिती होती.

====================
67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त वंदन करण्यासाठी चंद्रपूरातील पवित्र दिक्षाभुमीवर राज्यभरासह बाहेर राज्यातील बौध्द अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सदर अनुयायांना मायेचा घास भरविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिक्षाभुमी परिसरात पुरी भाजी चा स्टॉल लावण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन करत पुरी भाजी वाटप कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी हजारो अनुयायांनी पुरी भाजीचा लाभ घेतला. यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडीसह ईतर आघाडींच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here