Home
Home चंद्रपूर *जनसवाद माध्यमातून शिवसेना (उबाठा) चा वरोरा-भद्रावतीत भाजपा व गद्दारांचा भांडाफोड*

*जनसवाद माध्यमातून शिवसेना (उबाठा) चा वरोरा-भद्रावतीत भाजपा व गद्दारांचा भांडाफोड*

0
99

==========================

चंद्रपूर, ३१ डिसेंबर २०२३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी व गद्दारांचा भांडाफोड जनसवाद माध्यमातून सतत सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आज दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी वरोरा शहरातील अभ्यंकर वार्डात शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन भांडाफोड केला.

========================

यावेळी विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा युवासेना अधिकारी रोहण कुटेमाटे, युवती सेना अधिकारी प्रतिभा माडंवकर, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

========================

यावेळी शिवसैनिकांनी भाजपा व गद्दारांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, भाजपाने जनतेला फसवले आहे. भाजपाच्या सरकारमुळे देशाला अनेक संकटे आली आहेत. गद्दारांनी शिवसेनेचे नुकसान केले आहे.

=======================

यावेळी शिवसैनिकांनी स्थानिक समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य विषयक समस्या व भविष्यात कोणतेही समस्या असेल तर शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” वरोरा येथे संपर्क साधावा अशी माहिती दिली.

=======================

या उपक्रमाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here