==========================
*वरोरा*
=========================
संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव समिती, बोपापुर (खांबाडा) च्या वतीने आज दि.03 ला संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधत प्रगट दिन सोहळा व हरिकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करतांना संत गजानन महाराज यांचे जीवनचरित्र उलगडले तसेच विविध विषयावर चर्चा केली व गावातील समस्या जाणुन घेतल्या व युवकांना मार्गदर्शन केले. तसेच स्व.श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध योजनांची माहिती दिली आणि नागरीकांना या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरूवात ग्रामस्वच्छतेने करण्यात आली त्यानंतर श्री च्या मुर्तीचा अभिषेक करुन श्रीची पालखी व शोभायात्रा दिंडी भजनाच्या माध्यमातुन काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प.शरद महाराज वैद्य यांचे काल्याचे किर्तन व किर्तन झाल्यानतंर श्री च्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, प्रशांत इंगळे, सागर धोटे, विकास गोहणे, केशव न्याहारे, गजानन तेजणे, किसन टोपलमोडे, केशव न्याहारे, नारायण गोहणे, कैलास मेश्राम, प्रयाग गोहणे, पवन धोटे, विठ्ठल गोहणे, मोहित धोटे, ईश्वर धोटे, जागो धोटे, राहुल गोहणे, वैभव लडके, आकाश धोटे, तथा गावातील समस्त महिला, पुरूष तथा युवक उपस्थित होते.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















