रामनवमी निमित्त काळाराम मंदिर येथून निघालेल्या रथयात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत.

0
22

=======================                        *चंद्रपूर*                 =========================               रामनवमी निमित्त काळाराम मंदिर येथून रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रथयात्रेचे स्वागत करत प्रभु श्री रामाची पुजा अर्चना केली त्यांनतर रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनिष महाराज व काळाराम मंदिर विश्वस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.    ===========================            देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातही रामनवमी निमित्त संपुर्ण शहर सजुन निघाले होते. दिवसभरच शहरातील विविध मंदिरात पुजा अर्चना करण्यात आली. तर संध्याकाळी शहरातील मंदिरांमधून शोभायात्रा काढण्यात आल्या. काळाराम मंदिर येथून श्री प्रभु रामचंद्र यांची रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पुजा केल्या नंतर सदर रथयात्रेला सुरवात झाली. ही रथयात्रा शहराच्या मुख्यमार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालुन पून्हा कळाराम मंदिर येथे दाखल झाली या शोभायात्रेत शेकडो रामभक्त सहभागी झाले होते.    ========================                       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here