*घुग्घुस शांती धाम (हिंदु) स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करा*

0
16

=============================

*शरद मल्हारी पाईकराव
घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी* ============================                घुग्घुस येथील शांती धाम (हिंदु) स्मशान भुमी येथे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंतविधी करण्याकरीता नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शांती धाम हिंदु स्मशान भुमी येथे एक हायमार्ट लाईट ची व्यवस्था आहे परंतु त्या लाईट चा प्रकाश हा शव दाहिनी पर्यंत येत नसल्याने तिथे मोबाईल टॉर्च लावुन अंतविधी करावा लागत आहे . =============================              तसेच मेन गेट जवळ हि लाईट ची सुविधा नसल्याने त्या जागी सुध्दा खुप अंधार राहतो. =============================                त्या करीता वंचित बहुजन आघाडी, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात नगर परिषद घुग्घुस मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे,                     ==========================                     मेन गेट ते शव दाहिनी पर्यंत स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करण्यात यावी. जणे करुन रात्रो ला सुध्दा अंतविधी करण्यास घुग्घुस येथील नागरिकांना त्रास होणार नाही, =============================           निवेदन सादर करतांना जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, अशोक भगत, आशिष परेकर, नकुल निमसटकर व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. =============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here