*आगामी ईद उल अज़हा (बकरी ईद) निमित्त शहर पोलिस स्टेशन येथे बैठक संपन्न*

0
25

=============================== 

*चंद्रपूर* 

================================    आगामी ईद उल अज़हा (बकरी ईद) निमित्त शहर पोलिस स्टेशन येथे शांतता समिती सदस्य तथा मस्जिद चे मौलाना, अध्यक्ष,पदाधिकारी व ईदगाह कमिटी पदाधिकारी यांची आगामी(बकरी ईद) ईद उल अज़हा संबंधाने मंगळवार दिनांक ११.०६. २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वा.पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे शांतता समिती व जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मस्जिद चे मौलाना, मस्जिद,ईदगाह कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी तथा शांतता समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. =============================              चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मंगेश भोंगाडे यांनी सांगितले की =============================          आगामी सण बकरी ईद ईद-उल-अज़हा 17 मे 2024 रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी संदर्भात चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे ही बैठक घेण्यात आली अस्ल्याचे सांगीतले तसेच तसेच सहायक पोलिस निरीक्षक राहुल गुहे यानी सांगितले की हा सण साजरा करतांना कोणाच्याही भावना दुखणार नाही याची दखल घेण्यात यावी तसेच आपणास कोणाकडून ही त्रास दिला गेल्यास आम्हास संपर्क करावे कायदा हातात घेऊ नये या आशयाचे मार्गदर्शन केले. =============================                 या बैठकीत चंद्रपुर जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ.सुचिता धांडे यांनी सांगितले की ज्या जनावरांची कुरबानी आपण तात्पुरत्या सलॅटर हाऊस मध्ये करणार आहात त्यास टॅग असणे आवश्यक आहे असे सांगत जनावराला टॅग नसेल तर आमच्या विभागामार्फत आपण माहिती दिल्यास लावण्यात येईल असे सांगितल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ===========================                  जिला शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिके कडून 17,18,19 तीन दिवस कुरबाणी केली जात असल्याने तीन दिवस सलग जास्त वेळ करिता पाणीपुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली तसेच दारुल उलूम मोहम्मदीया येथे स्लेटर हाउस असल्याने सलग तीन दिवसांकरिता टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच विद्युत विभागाकडून विज पुरवठा खंड न पडता सुरळीत राहिल्यास मुस्लिम बांधवांना सोयीचे ठरणार असे सूचित करत चंद्रपूर जिल्हयात सर्व सण त्योहार शांततेत उत्साहाने प्रशासनाच्या सहकार्यामुळे घडत असल्याचे आपले इतिहास असल्याने या वर्षी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या सर्व सूचना लक्षात घेऊन हा सण आनंदाने उत्साहात साजरे करणार अशी सर्व उपस्थितांचा वतीने ग्वाही दिली. ===============================        चंद्रपुर चे उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव या बैठकीत प्रामुख्याने उपस्थितीत होते ते म्हणाले की १७/०६/२०२४ रोजी बकरी ईद (ईद-उल-अज़हा) हा सण मुस्लीम बांधवातर्फे मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे तसेच तीन दिवस कुर्बानी कार्यक्रम ही  चालणार आहे सदर सणादरम्यान कुर्बानी करीता गोहत्या, गोवंश अथवा गोमांस वाहतुक करणे यावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी संवर्धन (सुधारीत) कायदा अन्वये दिनांक ०४/०३/ २०१५पासुन संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश करीता हा कायदा लागु केला आहे.     ==============================        कुर्बानी काळात आपले कडुन कोणतेही प्रतिबंधीत जनावरे यांची कुर्बानी करण्यात येऊ नये, तसेच बकरी ईद करीता चंद्रपूर शहर महानगरपालिका कडुन तात्पुरते नेमुन दिलेल्या ठिकाणीच कुर्बानी करण्यात यावी तसेच गोवंश जनावराशिवाय म्हैस, रेडे, यांची कुर्बानी करण्यापुर्वी त्यांचे मांस मानवाने खाण्यायोग्य काहे काय? याबाबत जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त चंद्रपुर यांचे कडुन तपासणी करून घ्यावे.मांस किंवा रक्त इतरत्र किंवा रस्त्याने पडु नये याची ही दक्षता घ्यावी असे सांगत या बैठकीत ज्या सूचना सुझाव आम्हास मिळाल्या आहे.त्याचा पाठपुरावा आमच्याकडून निश्चितपणे करण्यात येईल असे विश्वास व्यक्त करीत सखोल असे मार्गदर्शन सुधाकर जाधव यांनी केले. ============================                    या बैठकीत जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,जिल्हा शांतता समिती सदस्य राजेंद्रसिंह गौतम, सुबस्टियन जॉन, बापू अंसारी सह चंद्रपूर शहर महानगर पालिका प्रतिनिधी डॉ.अमोल शेळके, जिल्हा पशु संवर्धन च्या सहायक आयुक्त डॉ. सुचिता धांडे,डॉ. ए.डी.शेडमाके, सॅनिटरी इन्स्पेक्टर जगदीश शेंद्रे, ==============================              शहर शांतता समिती चे रेखा दानव, मोरेश्वर खैरे, दर्शन बुरडकर, रामनगर शांतता समिती सदस्य ताजुद्दिन शेख,छोटी मस्जिद कमेटीचे मोहम्मद साबीर,सय्यद ईजहार, जामा मस्जिद चे फिरोज खान रिझवी, मो.शकील अहमद, अब्दुल शदिद,दारुल उलूम मोहम्मदीया चे शेख मुश्ताक रिझवी, अशफाक हुसैन, अब्दुल वकील, अहमद मीया कादरी,सह अन्य मस्जिद, इदगाहचे रौफुल हसन,अहमद कुरेशी,शेख महेबुब, इस्माईल पठाण, वसीम शेख,मोहम्मद अकील सह विशेष शाखेचे दिलीप कूर्झेकर, सुरेंद्र खनके, लक्ष्मण रामटेके सह अनेक मान्यवर या बैठकीत उपस्थित होते. =============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here