*आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोष आंदोलन…*

0
14

============================

*गोर गरीब शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल होऊ देणार नाही :- जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा…*

==============================

दिनांक 12 जून 2024 रोजी आम आदमी पार्टी तर्फे स्मार्ट मीटर विरोधात राज्यव्यापी आंदोलन करून एम. एस. ई. डी. सी. एल यांना निवेदन देण्यात आले. भद्रावती मधे सुद्धा या आंदोलनाचे पडसाद उमटले. आम आदमी पार्टी भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. स्मार्ट मीटर हे जनसामान्य व शेतकऱ्यांचे हिताचे नाही तर बळी घेणारे उपक्रम आहे. हे उपक्रम फक्त भांडवलदार कंपनी साठी फायदा देण्या करिता आहे. याचा गोर गरिबांसाठी काही फायदा नाही. गोर गरीब शेतकऱ्यांना व सामान्य लोकांना विश्वासात न घेता जबरदस्ती ने हे फळतूचे उपक्रम जनतेच्या डोक्यावर थोपण्याच काम या केंद्र सरकारने व राज्य सरकार ने केला आहे. तत्काळ हे जीवघेणी योजना सरकार ने थांबवावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्या शिवा राहणार नाही असा मतआक्रोश एम.एस.ई.डी.सी.एल भद्रावती यांना निवेदन देतांना आम आदमी पार्टी चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सूरज शहा, जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, राजकुमार चट्टे ,सचिन पाटील, डोरा स्वामी, सूरज विश्वकर्मा, अजय पेटकर, मोहम्मद यामीन अली, प्रदीप लोखंडे, अशोक श्रीवास, रितेश नगराळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते , ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here