*शहरात जोरदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वी नालेसफाई व झाडांची छठाई करा:- आम आदमी पार्टी बल्लारपूर*

0
12

===================================

*बल्लारपूर* 

===================================

बल्लारपूर
दिनांक- 19/06/2024
शहरात पावसाळ्याची स्थिती असतांना देखील शहरातील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची अजून सफाई झालेली नाही. जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास नाल्यांचा घाण नागरिकांच्या घरात घूसू शकतो तसेच हा घाण रस्त्यावर देखील साचू शकतो. यामुळेच आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने जोरदार पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच नालेसफाई चे काम पूर्ण करा या मागणीला घेऊन उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन दिले. तसेच 5-6 दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक झाडे कोसळल्याचे देखील दिसून आले, त्यामुळे आता पावसाची जोरदार सुरूवात होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेली अशी झाडे जी पावसात कोसळू शकतात व दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात अश्या झाडांच्या छाटणी चे काम देखील लवकरात लवकर करण्यात यावे अशी देखील विनंती आप शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, गणेश अकोले यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here