*आगामी मोहरम, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न*

0
22

============================

*आगामी मोहरम, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न* ============================== चंद्रपूर(वि.प्र.):चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे आगामी मोहरम, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा निमित्त शांतता समिती सदस्य सवारी धारक पदाधिकारी, मंदिर मस्जिद पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक चंद्रपूरचे तुरुंग अधिकारी सतीश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ===========================                       ही बैठक आगामी मोहरम तसेच आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा उत्सव  संबंधाने  बुधवार दिनांक ०३.०७. २०२४ रोजी सायंकाळी ०५.३० वा. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे घेण्यात आली. या बैठकीत चंद्रपूरचे तुरुंग अधिकारी यांनी सतीश सोनवणे यांनी चंद्रपूर कारागृह येथील हजरत बाबा गैबीशाह वली र.अ. ची दर्गा येत्या नऊ व दहा मोहरम रोजी सर्वसामान्य भक्तांना दर्शनासाठी उघडण्याबाबतची माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सामान्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरिता वरिष्ठाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करण्यात येईल असे देखील सांगितले. चंद्रपूर कारागृह येथे बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची विशेष दखल घ्यावी, अशी विनंती देखील केली. चंद्रपूर कारागृह येथील दर्गा मध्ये सवारीला प्रवेश मिळणार नाही करिता सर्वांनी याबाबतीत सहकार्य करावे अशी विनंती केली. चंद्रदर्शन प्रमाणे मोहरम ची तारीख ठरणार आहे. त्याचप्रमाणे मोहरमच्या नऊ तारखेला सर्वप्रथम  जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून चादर  चढविण्यात येणार आहे व रीतसर उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य भक्तांना बाबाच्या दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. हा प्रवेश मोहरमच्या 9 व 10 तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मिळणार आहे. अशी अशी माहिती या बैठकीत चंद्रपूर कारागृह चे तुरुंग अधिकारी सतीश सोनवणे यांनी दिली आहे. =============================             चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची दक्षता घेत सर्वांनी सर्व सण शांततेने व उत्साहाने पूर्ण करावे. असे आवाहन करीत सवारी चे आयोजक मंडळ यांनी सवारी ची मिरवणूक काढताना आपले वॉलेंटियर ठेवावे व कोणालाही कोणतीही इजा होणार नाही किंवा सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत कोणतेही संशयित व्यक्ती आपल्याला आढळून आल्यास त्याची माहिती आमच्या पोलीस विभागाला द्यावी असे सांगत उपस्थित सर्वांना आगामी सणाच्या शुभेच्छा देत अतिशय मोलाचे व महत्त्वाचे मार्गदर्शन केले हे मात्र विशेष! ===========================                      या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सुबेस्टियन एस.जॉन,एडवोकेट आशिष मुंधडा, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे शांतता समिती सदस्य दर्शन बुरडकर, संगीता कुर्झेकर, राजू राठोड, राजेंद्र आखरे, व मस्जिद कमिटीचे हाजी फिरोज खान,शेख मेहबूब, मोहम्मद शकील अहमद, शेख जफर अहमद, मोहरम सवारी धारक पदाधिकारी मनोज चंबूलवार, शेख इब्राहिम, राजू बल्लेवार, सुरेंद्र पेटकर, फारुख कल्लूमिया शेख, हमीद खान, अफजल खान मोहम्मद खान, व रामा दांड्या सवारी बंगला चे योगेश चहारे,अंकित भांदककर, स्वप्निल भांदककर,आकाश चहारे, तुषार राऊत अनिकेत चहारे योगराज चौधरी सह वेंडलीचे पोलीस पाटील संजय टोंगे, हिंगनाळा चे पोलीस पाटील श्याम साखरकर,जीवन गौरकार, आनंद पिंपळशेंडे, श्रीरंग वरारकर सुनील गोरे, निलेश वांढरे, विशेष शाखेचे सुजित बंडीवार, लक्ष्मण रामटेके सह अनेक मान्यवरांची या बैठकीत उपस्थिती होती.              =============================             *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here