=================================
चंद्रपूर महानगर :- विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून श्री राजकुमार लक्षमन जोशी यांची नियुक्तीचंद्रपूर, 29 ऑगस्ट 2024: बावीस चौक, बालाजी मंदिर मागे, बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील रहिवासी श्री राजकुमार लक्षमन जोशी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले नियुक्ती पत्र तसेच ओळखपत्र हस्तांतरित करून त्यांना अभिनंदन दिले. समाजसेवा आणि पर्यावरणपूरक कार्यात योगदानश्री राजकुमार जोशी हे पेशाने फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असून, ते अनेक सामाजिक, धार्मिक, आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत शहरातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना राजी करून 19 नेत्रदान करवून घेतले आहे, ज्यामुळे 38 लोकांना जग पाहता येत आहे. ते मोफत शवपेटी देण्याचा उपक्रम देखील राबवतात. तसेच, ऑपरेशन झालेल्या किंवा अपघात झालेल्या नागरिकांसाठी वॉकर, बैसाखी आणि संडास कुर्ची उपलब्ध करून देतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्धश्री राजकुमार जोशी नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहित करतात आणि प्रत्येक वर्षी शंभर वृक्ष लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांचा पर्यावरणपूरक प्रवास अजूनही सुरू आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसरआझाद बगीचा गूड मॉर्निंग ग्रूप चे अध्यक्ष म्हणून आरोग्यप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेले जोशी, श्री गुरुसाई भजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते अखंडितपणे लक्ष्मीनारायण मंदिरातून सकाळी धर्मजागरण प्रभात फेरीचे आयोजन करतात आणि गणेश मंडळातही सक्रियपणे सहभाग घेतात. त्यांच्या घराजवळील हनुमान मंदिरात नियमित पूजा-अर्चना करण्याचे कामहीकरतात. फोटोग्राफी क्षेत्रातील मान्यता रवी फोटो स्टुडिओचे संचालक श्री राजकुमार जोशी यांनी फोटोग्राफी क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पहिले व्हिडिओ एडिटिंग तंत्रज्ञान आणले आणि अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. सन 1992 ते 1998 पर्यंत सलग बेस्ट फोटोग्राफर पुरस्कार मिळवले आणि महाविदर्भ बेस्ट चिल्ड्रन्स फोटोग्राफर पुरस्कार 7 वेळा मिळवला आहे. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि हंसराजभैय्या अहिर यांच्या सुरुवातीच्या काळातील जवळपास सर्वच फोटो त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत. श्री राजकुमार जोशी यांच्या समाजसेवा आणि धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्याबरोबर कार्य करण्याची संधी मिळत राहो, हीच मंगलकामना. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















