Home
Home चंद्रपूर *सरदार पटेल महाविद्यालयात “पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमीका “या विषयावर व्याख्यान व प्राणीशास्त्र...

*सरदार पटेल महाविद्यालयात “पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमीका “या विषयावर व्याख्यान व प्राणीशास्त्र विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन संपन्न.*

0
77

=============================

चंद्रपूर(का.प्र.): सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे नुकतेच प्राणीशास्त्र विद्यार्थी मंडळ आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त मा. श्री विपीन पालीवाल उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्राचार्य डॉ. काटकर यांच्या हस्ते महानगरपालीका आयुक्त विपीन पालीवाल यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते प्राणीशास्त्र विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन करण्यात आले तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गुलाबपुष देऊन सन्मानित करण्यात आले.                                       

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर करू शकणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती अतिशय रंजक पद्धतीने पालीवाल यांनी दिली. ओला सुका कचरा व्यवस्थापन, एक झाड एक विद्यार्थी अशा प्रकारच्या योजना महानगरपालीकेद्वारे राबवीण्यात येतात. या बद्दल सांगतांना ते म्हणाले की, प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ कसा राहिल, तसेच प्रत्येकाने किमान आपल्याला आवश्यक तेवढा ऑक्सीजन कसा मिळवता येईल, पाण्याची बचत कशी होईल याचा विचार केला पाहीजे.

प्रमुख वक्ते म्हणून चंद्रपूरातील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते. “पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमीका ” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले चंद्रपूर शहराच्या प्रदुषणाची कारणे, सध्याची स्थिती आणि उपाययोजना याबद्दल त्यांनी प्रस्तुतीकरण केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. काटकर यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले तसेच सौरउर्जेचे महत्त्व उपयुक्तता विशद करून त्याची सोदाहरण विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अशा सामाजिक तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधीत चळवळीमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजलक्ष्मी कुळकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. संदेश पाथर्डे यांनी केले. संचालन प्रा. श्रावणी देगमवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अजय बेले, प्रा. संदेश पाथर्डे, प्रा. मोनाली गुरनुले प्रा. श्रध्दा मेश्राम, प्रा. कंचन यादव, प्रा. पुजा झनके, प्रमोद नारळे, गुरूदास शेंडे, सौ. सुवर्णा कुल्टे तसेच प्राणीशास्त्र पदवी व पद्व्युत्तर विभागाच्या विद्यार्थीनीनी परिश्रम घेतले.

कार्यकमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष मा. सौ. सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, व सन्माननीय सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी प्राणीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आहे.        =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here