Home
Home चंद्रपूर *कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध DR .मंगेश गुलवाडे*

*कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध DR .मंगेश गुलवाडे*

0
77

===============================

*कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध DR .मंगेश गुलवाडे* ============================            *इंडियन रेड क्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व सीपीआर प्रशिक्षण शिबीर* _______________________________

चंद्रपूर: इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नव नियुक्त कामगारांच्या आरोग्य तपासणीसह रुग्णांच्या हृदयरोगाशी संबंधित आजारांविषयी जागृती व सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.                                                  या विशेष शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती होती.                                         कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन डॉ.प्रदीप वर्घने (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. आशिष बारब्दे आणि पियूष मेश्राम यांनी केले.                                                                      शिबिरामध्ये नव नियुक्त कामगारांचे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासोबतच हृदयरोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि त्वरित उपचार पद्धती याबाबत सखोल माहिती देण्यात आली. सीपीआर प्रशिक्षणाद्वारे जीवन वाचवण्यासाठी त्वरित उपाययोजनांची सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.     =============================                हा कार्यक्रम कामगारांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.                                                      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सौरभ राजूरकर, डॉ.ट्विंकल डेंगळे, डॉ.ज्योती मुरमाडकर,डॉ. देवाशिष घुमे,सेफ्टी ऑफिसर गुणवंत व कुणाल लोखंडे, सुभाष मुरस्कर, आरिफ काझी यांनी अथक परिश्रम केले.    ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===============================            कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here