Home
Home चंद्रपूर *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढवले खेळाडूंचे मनोबल*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढवले खेळाडूंचे मनोबल*

0
69

===============================

*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढवले खेळाडूंचे मनोबल*     =============================
*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन*    ==============================        चंद्रपूर – प्रयत्न करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही. त्यामुळे आयुष्याच्या या स्पर्धेत आपल्या हृदयात प्रयत्नांची मशाल तेवत ठेवा. हृदयात प्रयत्नांच्या पराकाष्ठेची, विजयाच्या संकल्पाची मशाल प्रज्वलित करा. त्यानंतर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले.                                                                        चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलेत होते.                  या कार्यक्रमाला आयटीआयचे (आयएमसी) अध्यक्ष सी. एम. राव, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, प्राचार्य श्री. वानखेडे, क्रीडा अधिकारी श्री. आवारे, स्टेट बँकेचे अधिकारी श्री. पवनकर. भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप नेते प्रकाश धारणे, मोरेश्वर गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.     ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================            कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here