Home
Home चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत.

0
67

============================

समाज बांधवांना शीतपेय वाटप; भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आयोजन

                               चंद्रपूर 

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेचे स्वागत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौक येथे करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध भागांतून निघालेल्या या शोभायात्रा गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्या. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने गांधी चौक येथे विशेष स्वागत मंच उभारण्यात आला होता.शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाजबांधवांना शीतपेय वाटप करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचारांचा प्रकाश आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी दूरदृष्टीने घडवलेले भारतीय संविधान, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहेत, असे आमदार जोरगेवार यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. =====================   *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        =====================        *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                                   *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here