==============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर,(का प्र) :- २७: दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर येथील संगीता दासरवार यांना स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाले. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती संगीता दासरवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संगीता विशाल दासरवार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होत्या. मात्र तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण होते. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात भेट घेऊन मदत मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.
शिलाई मशीन मिळाल्याने संगीता दासरवार यांनी स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळविण्यात मोलाचा हातभार लागणार आहे.
यावेळी संगीता दासरवार यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत, “ही मदत मला नवी उमेद आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी आहे,” असे भावनिक उद्गार काढले. ================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356























