================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर. (का प्र) :- पावसाळ्या पुर्वीची कामे, शहरातील नाले सफाई, कचरा सफाई याबाबत विशेष अभियान राबविण्यात यावे अशा सूचना माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त तसेच बल्लारपूर, मूल या नगर पालिका व पोंभुर्णा नगर पंचायतीच्या मुख्याधिका-यांना दिल्या आहेत.
साधारणतः ७ जुन पासुन मृग नक्षत्राला सुरवात होत असते. पावसाळयादरम्यान पाणी तुंबुन शहरातील नाल्यांमधील घाण रस्त्यावर येत असल्याचे आपण सातत्याने बघतो. हे टाळण्याच्या दृष्टीने पावसाचे पाणी तुंबु नये यासाठी शहरातील नाले सफाई, कचरा सफाई तसेच पावसाळयापुर्वीची सर्वसाधारण कामे करण्याच्या दृष्टीने एक विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. ज्या-ज्या नाल्याची सफाई करण्यात आली आहे. त्याची माहिती नागरिकांना व्हॉट्सअॅप च्या माध्यमातुन देण्याची आवश्यकता आहे. शक्य असल्यास त्याचे फोटोग्राफ्स देखील पाठवावे. नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामावर विश्वास कमी आहे. यासंदर्भात लोक जागरण करणे, लोकांना यासंदर्भातील माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी एक प्रेसनोट आपल्यातर्फे वृत्तपत्रात प्रसिध्द करणे देखील आवश्यक आहे, अशा सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना पत्रा द्वारे दिल्या आहेत. ===================*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356























