Home
Home चंद्रपूर आता गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ‘जलरथा’चे उद्घाटन

आता गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ‘जलरथा’चे उद्घाटन

0
89

===============================

शासकीय योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी बीजेएसचा पुढाकार

                    चंद्रपूर

            हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र) :– महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृतीसाठी करणार्‍या जलरथाचे किशोर जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सकल जैन समाज चे महासचिव संदीप बांठिया, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गौतम कोठारी , सामाजिक कार्यकर्ते  संजय कोठारी, बिजेस जिल्हाध्यक्ष दिपेंद्र पारेख, जिल्हा सदस्य अनिकेत लूनावत, जिल्हा सचिव ऋषभ सकलेचा, सामाजिक कार्यकर्ते मोहित मोदी, तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक दीक्षांत बेले, प्रकाश देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.  शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्‍यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.

     या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’वर ऑनलाइन भरावा. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे. योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच  ‘www.shiwaar.com’  या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावाअसे आव्हान बीजेएस च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ===========================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===============================             *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here