Home
Home चंद्रपूर रामाळा तलावाच्या संरक्षण भिंतीच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी.

रामाळा तलावाच्या संरक्षण भिंतीच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी.

0
69

 

                               चंद्रपूर

                       हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या संरक्षण भिंत बांधकामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी काल रविवारी पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या कामामुळे तलावाचे जतनसौंदर्यीकरण आणि परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेची खात्री होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे अभियंता शिडाम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमाजी नगरसेवक देवानंद वाढईप्रदीप किरमेप्रशांत चौधरीशिवसेना शहरप्रमुख बंडू हजारे, रामाळा तलाव बचाव संवर्धन संघर्ष समितीचे जुगल सोमानीसुधीर बजाजविनोद सोन, राशिद हुसेननकुल वासमवारसंजय बोरघाटेकार्तिक बोरेवारआदी उपस्थित होते.

रामाळा तलाव हा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनशतकानुशतकं पासून नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित आहे. तलावाच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक हत्त्वामुळे त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने शासनाच्या 30 कोटी रुपयांच्या निधीतून संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे काम दर्जेदारमजबूत आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या भावना या तलावाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या कामात कोणतीही त्रुटी राहू नयेयासाठी दक्षता घ्यावीअसे निर्देश यावेळी देण्यात आले.

भिंतीच्या बांधकामामुळे तलावाच्या किनाऱ्यांचे संरक्षण होईल आणि तलावात गाळ जाण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामीतलावाचे पाणी शुद्ध  राहील आणि परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळणार आहे. तलावाच्या संरक्षणाच्या या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या ऐतिहासिक ओळखीचेच नव्हेतर जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मोठी मदत होईल. रामाळा तलाव हे चंद्रपूरचे भूषण आहे. या तलावाचे जतन करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. काम वेळेत पूर्ण व्हावेयासाठी अधिकारी आणि अभियंते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांची अपेक्षा आणि तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता कोणतीही तडजोड केली जाणार नाहीअसेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                         *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here