चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- पाश्चिमात्य देश भारताला पितृसत्ताक देश मानतो. ज्यांच्या देशात महिलांना मतदानाचा अधिकारच नव्हता आणि तो मोठ्या संघर्षातून त्यांना मिळवावा लागला, असाही देश असे चुकीचे विमर्श पसरवते तेव्हा त्यांची कीव येते. अहल्यादेवी होळकर यांच्यासारख्या स्त्री शक्तीचा वारसा सांगणार हा भारत देश आहे. अहल्यादेवी भारतीय वारश्याच्या संरक्षक आहेत. आजच्या तरुर्णीना हाच वारसा जपला पाहिजे, त्यांचे आदर्श घेतले पाहिजे, असे आवाहन वीर रस कवयित्री श्रध्दा शौर्य यांनी येथे केले. 
शनिवार, ३१ मे रोजी सायंकाळी येथील प्रियदर्शिनी सभागृहात पार पडलेल्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. मंगेश गुलवाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, रा. स्व. संघाचे नगर संघचालक तथा ज्येष्ठ विधीज्ज्ञ रवींद्र भागवत मंचावर उपस्थित होते.
डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, पेशवे चालून आले हे माहित होताच, त्यांना पत्र लिहून अहल्यादेर्वीनी तुलनात्मकरित्या सैन्यबळ आमच्याकडे जास्त आहे त्यामुळे विजय आमचचा आहे. पण यदाकदाचित आपण जिंकलात, तर आपण एका स्त्रीशी युध्द केलात म्हणून तुमच्या विजयाचे गुणगाण तर होणारच नाही आणि आम्ही जिंकलो, तर एका स्त्रीशी युध्द करून परास्त झाल्याची नाचक्की मात्र आपल्याला सहन करावी लागेल. याचा अर्थ कुठल्याही परिस्थितीत आपण हरणार आहात, असा संदेश पाठवला. त्यानंतर पेशव्यांनी त्यांच्याशी युध्द केले नाही, उलट त्यांना राजमाता ही पदवी दिली. याला म्हणतात युध्दाचे व्यवस्थापन. व्यवस्थापन शास्त्र शिकणाऱ्या तरूण-तरुणींनी पुण्यश्लोक अहल्यादेवींच्या त्या पत्रातून बोध घ्यावा, कल्याणकारी राज्य कसे चालवायचे याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर अहल्यादेवींनी घालून दिला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नायिका नव्हे, तर अहल्यादेवीच आमचा आदर्श व्हावा, असे प्रतिपादनही डॉ. बोकारे यांनी केले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह समितीने केवळ या महोत्सवाची सुरुवातच केली नाही, तर मोठ्या थाटात त्याचे समारोपही केले. वर्षभर अत्यंत चांगले कार्यक्रम राबवले, असे कौतुकोद्गारही डॉ. बोकारे यांनी काढले. तर पुण्यश्लोक अहल्यादेर्वीनी महिलांच्या कल्याणासाठी आणि अधिकारासाठी लढा दिला. शिक्षणाला चालना दिली. मंदिरे जपली. राज्य कसे करावे, याचा वस्तूपाठ घालून दिला, असे अॅड. भागवत म्हणाले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह समितीने वर्षभर चालवलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी समितीने काढलेल्या ‘कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मरणिका’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अत्यंत कमी वेळात स्मरणिका तयार करताना संपादकीय मंडळाला काय अनुभव आले. याचे विवेचन संजय रामगिरवार यांनी केले. यावेळी डॉक्टर कल्पना गुलवाडे उषा बुक्कावार, वनिता मडपुरवार, वर्षा नैताम, इशिता काळे, विमल कोडापे, गीता चव्हाण व सपना दिंडे या कर्तबगार महिलांचा तसेच १० वी व १२ वीतील गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला. नंतर रंगारंग कार्यक्रम पार पडला. संचालन प्रवीण गिलबिले व विशाल कोरडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील पोराटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री वसंतराव थोटे निलेश काळे डॉ. यशवंतराव कन्नमवार अंजली हस्तक डॉ राजेश इंगोले डॉ. जयेश चक्रवर्ती छबुताई वैरागडे अपर्णा चिडे रंजू मोडक संगीता पोतले दिवाकर थोटे गणपतराव येवले कैलास उराडे उषाताई वीरमलवार ज्योतीताई दरेकर कल्पनाताई पालीकुंडवार प्रज्ञा मदनकर सुनील इखारे अश्विनी खोब्रागडे पवन ढवळे प्रवीण उरकुडे मयूर भोकरे संतोष तालन प्रज्वल गिलविले राकेश बोमनवार अमित निरंजने महेश आस्कर नंदू मोंढे भानेश येगगेवार यांनी अथक परिश्रम घेतले.
=============== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356























