Home
Home चंद्रपूर महेश नवमीच्या निमित्ताने बुधवार, ४ जून रोजी शहरात भव्य शोभायात्रा.

महेश नवमीच्या निमित्ताने बुधवार, ४ जून रोजी शहरात भव्य शोभायात्रा.

0
56

                           चंद्रपूर 

                      हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- महेश नवमी उत्सवाच्या निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शोभायात्रेपूर्वी लक्ष्मीनारायण मंदिरात भगवान शंकराची आरती होईलत्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल.

महेश नवमीच्या शुभ अवसरावर माहेश्वरी चंद्रपूर तालुका संघटनमाहेश्वरी युवक मंडळ आणि माहेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये दाताळा येथील बिग बुल टर्फवर बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होतीज्यामध्ये महिलांनी आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

बालक आणि महिलांसाठी लिंबू शर्यतबोरी शर्यतसंथ सायकलिंग अशा मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच कॅरम आणि बुद्धिबळ (शतरंज) स्पर्धांचाही यशस्वी आयोजन झाले. या सर्व उपक्रमांमुळे महेश नवमीचा उत्सव अधिक रंगतदार आणि आनंददायी ठरला. सर्व सहभागी आणि आयोजकांचे सहकार्य अत्यंत प्रशंसनीय राहिले. या वेळी विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष दामोदरजी सारडाजिल्हाध्यक्ष शिवनारायण सारडातालुका अध्यक्ष उमेश चांडकसेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुशील मुंधडादिनेश बजाजसुरेश राठीतहसील सचिव राजेश काकानीमहिला मंडळ अध्यक्षा अल्का चांडकपायल सारडायुवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सारडाऋषिकांत जाखोटियायुवक मंडळाचे माजी अध्यक्ष शक्ति धूतश्रवण मंत्री सुधीर बजाज आणि समाजबांधव राजकुमार जाजू यांची उपस्थिती होती. ४ जून रोजी होणाऱ्या शोभायात्रेत अधिकाधिक समाजबांधवांनी सहभागी व्हावेअसे आवाहन महेश नवमी उत्सवाचे प्रकल्प संचालक ललित कासट यांनी केले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here