चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची नागपूर तर भंडारा अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे
यांची चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती!
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर (वि.प्र.): महाराष्ट्र शासन गृह विभागाने शासन आदेश क्र. एच.डी.-१००१०/२८/२०२५/पोल-१ नुसार दिनांक : २७.०६.२०२५.
शासन आदेश निर्गमित केले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार, प्रशासकीय कारणास्तव, भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची पोलिस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर येथे बदली करण्यात आली असून भंडारा येथील अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे
यांची चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.























