Home
Home चंद्रपूर *बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा – आ. सुधीर...

*बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार*

0
64
बल्लारपूरला घरकुल योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार.
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक : विविध अडचणींवर चर्चा.
                        चंद्रपूर

 

                  हॅलो चांदा न्युज

 

चंद्रपूर,(का प्र) : – बल्लारपूर मतदारसंघातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई, शबरी, घरकुल योजना तसेच इतर राज्यस्तरीय योजनांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुनियोजित व्हावी, तसेच बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा, यासाठी प्रभावी व समन्वयाने कार्य करा, अशा सूचना राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
बल्लारपूर मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष रणंजय सिंग,सतीश कणकम,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार (बल्लारपूर) रेणूका कोकाटे, तहसीलदार (मुल) मृदूला मोरे, बल्लारपूरचे न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, संदीप दोडे(मुल), निखिल लांडगे (पोंभुर्णा), संवर्ग विकास अधिकारी (चंद्रपूर) संगीता भांगरे, धनंजय साळवे (बल्लारपुर), विवेक बेलालवार (पोंभुर्णा), अरुण चनकणे (मुल), बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आदींची उपस्थिती होती.

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या हजारो लाभार्थ्यांना भेडसावत असलेल्या निधीचा विलंब, तांत्रिक अडचणी, अपूर्ण बांधकाम व जागेच्या समस्यांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून घरकुलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या।

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here