Home
Home चंद्रपूर छत्रपती नगर येथील योगभवनाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

छत्रपती नगर येथील योगभवनाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

0
61
                          चंद्रपूर
                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र ) :- आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतर्गत तयार होणार असलेल्या छत्रपती नगर येथील कुमरे लेआऊटमध्ये मंजूर केलेल्या ५० लाख रुपयांच्या सुसज्ज योगभवनाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना सुसज्ज आणि आरोग्यदायी योगाभ्यासासाठी भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. नियमित योगाभ्यासासाठी आधुनिक हॉल, स्वच्छ सुविधा आणि आवश्यक साहित्य या भवनात उपलब्ध राहणार आहे.या वेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी फक्त आकड्यांपुरता न राहता खरोखरच लोकांच्या हितासाठी वापरला जावा, हा आपला प्रयत्न आहे. या योगभवनामुळे नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी मोठी मदत होईल. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खनिज संपत्तीचा लाभ स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मिळावा, हीच आपली भूमिका आहे.

त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणाऱ्या या उपक्रमासाठी निधी मंजूर करून कामाला गती दिली. या इमारतीत नागरिकांना नियमित योगाभ्यास करता येईल, महिलांना, तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित जागा आणि सुविधा मिळतील. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी ही आधुनिक सुविधा मोलाची ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.

दत्त नगर येथील  ४५ लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन.

दत्त नगर येथे स्थानिक विकास निधीतून ४५ लाख रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या खुले रंगमंच, ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण आणि कंपाऊंड वॉलच्या बांधकामाचा उद्घाटन सोहळा रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, महानगरपालिकेचे पवार, विजय चंदावार, सुधाकर श्रीपूरवार, कैलास रोडे, प्रा. प्रेमानंद खंडाळे, हरिदास कापटे, उमेश्वर आश्रम, प्रकाश कासार्लेवार आदींची उपस्थिती होती.

या विकासकामांचा शुभारंभ उत्साहात झाला असून, परिसरातील नागरिक, स्थानिक मंडळी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या विकासकामामुळे नागरिकांना सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. खुले रंगमंच आणि ओपन स्पेसमुळे विविध कार्यक्रम, मेळावे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक उपक्रमांसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण झाली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here