Home
Home चंद्रपूर डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांना “विदर्भ रत्न पुरस्कार 2025” ने सन्मानित – समाज...

डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांना “विदर्भ रत्न पुरस्कार 2025” ने सन्मानित – समाज परिवर्तनासाठी असामान्य योगदानाची दखल.

0
67

हॅलो चांदा न्यूस

नागपूर.(वि प्र) :- 20 जुलै 2025 विदर्भातील सामाजिक कार्याच्या क्षेत्रात अपवादात्मक योगदान देणारे डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांना प्रतिष्ठेचा “विदर्भ रत्न पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. BCN न्यूज व नागपूर मेट्रो समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर पॉईंट हॉल, नागपूर येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.                   या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा नितीन गडकरी, ज्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या समवेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री डाॅ. निशिगंधा वाड, राज्य मंत्री मा. आशिष जैस्वाल, अभिनेत्री ज्योया शेख आणि BCN ग्रुपचे संचालक सिराज शेख, फिरोज शेख आणि इम्रान शेख हे मान्यवर देखील मंचावर उपस्थित होते.            “शिका, कमवा आणि प्रगती करा” – एक चळवळ निर्माण करणारा समाजसेवक

डाॅ. रमेशकुमार बोरकुटे हे “यहोवा यिरे फाऊंडेशन”चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. शिक्षण, उद्योजकता, कौशल्य विकास आणि बेरोजगारी निर्मूलन या क्षेत्रांत त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने हजारो युवकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व रोजगार संधी उपलब्ध करून दिल्य आहेत.

त्यांची सामाजिक कामांची संकल्पना म्हणजेच – “शिका, कमवा आणि प्रगती करा”. हा मंत्र केवळ घोषवाक्य नसून, त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवून अनेकांना आयुष्य घडवण्याची दिशा दिली आहे.पुरस्कार स्वीकारताना डॉ. बोरकुटे यांचे मनोगत

पुरस्कार स्वीकृत करताना डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या:

BCN न्यूज ग्रुपने माझ्या कार्याची दखल घेतली, हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. समाजाच्या हितासाठी झटणे हेच माझं ध्येय आहे. मला आनंद आहे की माझ्या प्रयत्नांना आज समाज मान्यता देतो आहे. बेरोजगार युवकांना उद्योजक बनवणे हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी अखंड कार्यरत आहे.

कार्यक्रमात उत्साह आणि प्रेरणा

या समारंभात विदर्भातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सुंदर संयोजन BCN न्यूज ग्रुपच्या वतीने करण्यात आले.                    या सोहळ्यानंतर यहोवा यिरे फाऊंडेशन टीम, स्थानिक मित्रमंडळी, हितचिंतक आणि पत्रकार संघाने डॉ. रमेशकुमार यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here