Home
Home चंद्रपूर पालखी सोहळा आणि महाकाली मातेच्या प्रतिष्ठापनेने श्री माता महाकाली महोत्सवाला थाटात सुरुवात.

पालखी सोहळा आणि महाकाली मातेच्या प्रतिष्ठापनेने श्री माता महाकाली महोत्सवाला थाटात सुरुवात.

0
117

पाच दिवस चालणार विविध धार्मिकसामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमउद्या सवई भट यांची भक्तीमय गाण्यांची मेजवानी

HELLO CHANDA NEWS

               चंद्रपूर.(का. प्र.) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित माता महाकाली महोत्सवाची पालखी सोहळा आणि श्री माता महाकालीच्या प्रतिष्ठापनेने थाटात सुरुवात करण्यात आली. यावेळी दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रतिष्ठापनेनंतर मातेची महाआरती करत मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

           यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी विनय गौडापोलिस अधीक्षक सदर्शन मुमक्काजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहतहसीलदार विजय पवारकल्याणी किशोर जोरगेवारमनीष महाराजश्याम धोपटेप्रा. प्रमोद कातकर, विश्वस्त सुनील महाकाले, राजू शास्त्रकार, अजय वैरागडे, जयश्भारी कापसे, मनीषा पडगिलवार भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतडे, आशा महाकाले, माजी महापौर राखी कंचर्लावारमहिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडेअजय जयस्वालबलराम डोडाणीमहामंत्री सविता दंडारे यांच्यासह माता महाकाली महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

   महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी जैन मंदिर येथून माता महाकालीच्या पालखी सह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात आमदार किशोर जोरगेवार सहपरिवार सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती.शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा महाकाली मंदिरात पोहोचली. त्यानंतर महोत्सव पंडालात महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

            यानंतर नवरात्रोत्सव दरम्यान जन्मलेल्या कन्यारत्नांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची नाणी देण्यात आली. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटनही यावेळी पार पडले. दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी धार्मिकसांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी कन्यापूजन आणि भोजन तसेच सुहागन महिलांना बांगड्या भरून देण्यात आल्या.

                        श्री माता महाकाली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीमहाकाली मातेच्या आशीर्वादाने हा महोत्सव केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता समाजसेवेचे व्रत बनला आहे. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमांना महत्त्व देणेही आपली संस्कृती आहे. या परंपरेला पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. महाकाली महोत्सवात केवळ भक्ती नाहीतर समाजहिताचे कार्यदेखील केले जाते. कन्यारत्नांचा गौरवआरोग्य शिबिरेमहिलांसाठी उपक्रमविद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे या महोत्सवाचे खरे वैभव आहे. महाकाली महोत्सव देशभरात पोहोचला असून येथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हेच या महोत्सवाच्या आयोजनाचे खरे यश असल्याचे ते यावेळी म्हणाले.

        उद्याचे कार्यक्रम

                 सुप्रसिद्ध गायक सवई भट उद्या आपल्या सुरमधुर भक्तीगीतातील मेजवानी सादर करणार आहेत.
सकाळच्या आरतीनंतर ११ वाजता जागर कवितेचा या महिलांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ९९९ ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात येणार आहे.
दुपारी ३ वाजता स्थानिक कलावंतांचा नृत्य जल्लोष कार्यक्रम पार पडणार असून
सायंकाळी ७ वाजता इंडियन आयडल प्रसिद्ध गायक सवई भट यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here