Home
Home चंद्रपूर ज्येष्ठांचा अनुभव समाजासाठी दिशादर्शक दीपस्तंभ – आ. किशोर जोरगेवार.

ज्येष्ठांचा अनुभव समाजासाठी दिशादर्शक दीपस्तंभ – आ. किशोर जोरगेवार.

0
135

७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक संघाचे आयोजन.

HELLO CHANDA NEWS

            चंद्रपूर.(का. प्र.) :- हा दिवस अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिकही आहे. कारण आज ज्यांनी आपल्या आयुष्यातील सुवर्ण वर्षे समाजसेवा, कुटुंबवत्सलता आणि राष्ट्रनिर्मितीला अर्पण केली आहेत, अशा व्यक्तींचा आपण गौरव करीत आहोत. ज्येष्ठ हा शब्द केवळ वयानं मोठा असा नाही, तर तो अनुभव आणि संयम या गुणांचा प्रतीक आहे. ज्येष्ठांचा अनुभव समाजासाठी दिशादर्शक दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

                 ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर यांच्या वतीने रविवारी रामनगर येथे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                     या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मरोतराव मत्ते, सचिव प्रदीप जानवे, माजी अध्यक्ष गोपालराव सातपुते, उपाध्यक्ष गोसाई बलकी, उपाध्यक्ष डॉ. भानुदास दाभेरे, सहसचिव बंडू धोटे, कोषाध्यक्ष देवराव सोनपिंपरे, चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक सांगिडवार, सचिव पुरुषोत्तम राऊत, पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश गुंडावार, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिदास देवगडे, विठ्ठल-रुक्मिणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बिंदू बडगेलवार आदींची मंचावर उपस्थिती होती.

          यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ७५ वर्षे पूर्ण करूनही आजही अनेक ज्येष्ठ नागरिक समाजात सक्रिय आहेत, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात आणि तरुण पिढीसाठी आदर्श ठरतात  हे खरंच प्रेरणादायी आहे. रामनगर ज्येष्ठ नागरिक संघाने केलेली ही गौरवाची परंपरा म्हणजे वृद्धत्व ही ओझं नाही, ती एक संपत्ती आहे असा समाजाला दिलेला सुंदर संदेश आहे. या संघाने संध्यापर्व २०२५ विशेषांक प्रकाशित करून एक महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यातून आपल्या समाजातील विविध विचार, अनुभव आणि जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

                      ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवावर समाजाचे भविष्य उभे राहते. आपण शिकवलेले संस्कार, दिलेली शिकवण आणि दाखवलेले आदर्श हेच आमच्यासाठी मार्गदर्शनाचे अधिष्ठान असल्याचे ते यावेळी म्हणाले.

                       या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here