Home
Home चंद्रपूर मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. किशोर जोरगेवार.

मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. किशोर जोरगेवार.

0
130

राजमाता निवासस्थानी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची आढावा बैठक.

HELLO CHANDA NEWS

                 चंद्रपूर,(का. प्र.) : पदविधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

                या बैठकीत मतदार नोंदणी अभियानाची सविस्तर माहितीप्रगती आणि उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली. पदविधर नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर ते बुथ पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

            या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारविधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुरशहर महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडेभाजप नेते प्रकाश देवतळेयुवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपटमहामंत्री मनोज पालश्याम कनकमरवि गुरुनुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष आणि विविध आघाडी अध्यक्ष उपस्थित होते.

        बैठकीत बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कीपदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज आहे. त्यामुळे प्रत्येक पदवीधर नागरिकाने आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
मतदार नोंदणी हा केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याचे प्रभावी साधन आहेअसेही त्यांनी नमूद केले.

           त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जाऊन त्यांची नोंदणी सुनिश्चित करा. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून लोकशाहीच्या जडणघडणीचा भाग आहे. आमदार जोरगेवार पुढे म्हणाले कीमतदारसंघातील तरुण पदवीधरशिक्षककर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता वाढविणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे
नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सुलभ करण्यात आली आहे.

          नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावेअसे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here