Home
Home चंद्रपूर मुलचा विजय भविष्यातील विकासपर्वाची दारे उघडेल..!आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास.

मुलचा विजय भविष्यातील विकासपर्वाची दारे उघडेल..!आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास.

0
133

मुल नगरपरिषद निवडणुकीचा शुभारंभ.

मुलवासीयांची उसळलेली अफाट गर्दी जनसमर्थनाची साक्ष देणारी.

        चंद्रपूर,(का. प्र.) :  मुल शहरात ‘न भुतो न भविष्यती’ अशी कामे करण्यात आली. मुल शहराच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासासाठी मतदारांचा मतरुपी आशीर्वाद आवश्यक आहे. मुलच्या विजयामुळे भविष्यातील विकासपर्वाचे दारे उघडेल, असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आ. सुधीर मनगंटीवार यांनी व्यक्त केला. जाहिर सभेसाठी मुलवासीयांनी दाखवलेली उत्स्फूर्त अफाट गर्दी ही विश्वासाचे आणि जनसमर्थनाचे प्रतीक ठरली.

                       मुल येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत ते उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल नगरवासीयांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केलेल्या आणि पुढे करणार असलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही मतांची विनंती करीत आहोत.

    यासाठी मुल शहराच्या विकासाचा सविस्तर जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.  कोणत्याही खोट्या आश्वासनांना किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता मुलच्या खऱ्या विकासासाठी मतदान करा. आपल्या डोळ्यांसमोर झालेली कामे, बदलत जाणारे मुलचे स्वरूप आणि निर्माण झालेल्या सुविधा हाच आपल्या निर्णयाचा खरा आधार आहे.

        त्यामुळे आपले अमूल्य मत विचारपूर्वक, जबाबदारीने आणि मुलच्या विकासासाठी द्यावे, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
 
         यावेळी मुल नगरपरिषद निवडणुकीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुलच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेल्या ‘प्रगतीचा वचननामा’ चे उद्घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.गांधी चौकातील जाहीर सभेला मुलवासीयांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक अफाट गर्दीने विजयाची खात्री आजच मिळाली असून हा केवळ कार्यक्रम नाही तर मुलच्या उज्ज्वल भवितव्याचा ठाम निर्धार असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.

         आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, दिन, दुर्बल, वंचित, शोषित, गरीब आणि कष्टकरी यांची सेवा करण्याचा संकल्प घेऊन राजकारणात पाऊल ठेवले. मुल शहराच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये 5 कोटी 17 लाख 14 हजार 485 रुपये तफावत आहे. या विभागाचा आ. म्हणून हा निधी राज्य सरकारकडून नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत नागरिकांचा मालमत्ता कर वाढवला गेलेला नाही. मी आमदार म्हणून येथील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचेही. मुनगंटीवार म्हणाले.

मुलच्या सर्वांगीण आणि भक्कम विकासाचा प्रवास:

             मुलच्या विकासाचा हा प्रवास केवळ शब्दांवर नाही तर ठोस कामांवर उभा आहे. मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण, आकर्षक इको पार्क, अत्याधुनिक स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, व्यायाम शाळा, पत्रकार भवन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार, सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी, मुल पॉलिटेक्निक कॉलेजला मंजुरी दिली, नवीन पोलिस स्टेशन, ओव्हरब्रिज, पट्टे वितरण उपक्रम, रेस्ट हाऊस आणि योगाभवन या सर्व प्रकल्पांमुळे मुलच्या प्रगतीचा पाया अधिक भक्कम झाला आहे.

जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका.

              शहरातील विकास कामे न पाहता जातीच्या आधारावर मतदान केले तर त्या शहराचे भविष्य कोणीही सुधारू शकत नाही. त्यामुळे खोट्या आश्वासनाला व जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाला मतदान करा असे आवाहन देखील आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here