हिवाळी अधिवेशनात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत मागणी.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मोरवा विमानतळाचा रनवे वाढविणे तसेच तेथे आधुनिक आणि सुसज्ज प्रवासी सुविधा उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. मोहोळ यांना दिले आहे.
चंद्रपूर हा जिल्हा औद्योगिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून राज्यातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोळसा उत्खनन, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, सिमेंट उद्योग, संरक्षण उत्पादनाशी संबंधित प्रकल्प, घनदाट वनसंपदा तसेच जागतिक पातळीवर ओळख असलेले पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक घडी वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य करण्यासाठी हवाई संपर्क अत्यंत आवश्यक बनला आहे.
सध्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी मोरवा एअर स्ट्रिप ही एकमेव हवाई सुविधा उपलब्ध आहे. मात्र सद्यस्थितीत या एअर स्ट्रिपवर मर्यादित सुविधा असल्याने व्यावसायिक विमानसेवा सुरू करणे शक्य होत नाही. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तांत्रिक अभ्यासानुसार आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुधारणा केल्यास मोर्वा विमानतळावर ATR- 72 प्रकारचे प्रवासी विमान सहजपणे उतरू शकतात. यासाठी रनवेची लांबी किमान 1850 मीटरपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*