Home चंद्रपूर लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी योगदान द्या, मतदान करा – आ. किशोर जोरगेवार.
आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : लोकशाही सशक्त करण्यासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, प्रत्येक मतातून विकास, सुशासन आणि जनहिताची दिशा ठरते. याच जाणीवेतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील समित्र शाळा येथील मतदान केंद्रावर सहपरिवार उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान करणे म्हणजे केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे, विचारपूर्वक आणि कुटुंबासह मतदान करून लोकशाही अधिक मजबूत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*