Home
Home चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयाचे सात दिवसीय रा.से.यो. शिबिर संपन्न…! ‘विकसित भारतासाठी युवाशक्ती’चा जागर..!

सरदार पटेल महाविद्यालयाचे सात दिवसीय रा.से.यो. शिबिर संपन्न…! ‘विकसित भारतासाठी युवाशक्ती’चा जागर..!

0
118

 

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) :- येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच कढोली (बु.) येथे उत्साहात पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत करिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.

       राजुरा तालुक्यातील कढोली (बु.) येथे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

     विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

        शिबिरादरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चंद्रपूर सैनिक स्कूलचे मनोदिप ठाकूर यांनी ‘रा.से.यो. एक संधी’ यावर तर संध्याताई विरमलवार यांनी ‘विकसित भारत करिता युवाशक्ती’ या विषयावर प्रबोधन केले, तर या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार होते, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर सचिव सुधीर एस. इंगळे यांनी ‘पोक्सो आणि बालविवाह मुक्त भारत अभियान’ या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच डॉ. विशाखा आखाडे यांनी ‘सामाजिक भान काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच चंद्रपूर वाहतूक शाखेचे प्रविण सोनोने यांनी विद्यार्थ्यांना ‘रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचे’ धडे दिले, तसेच डॉ. उषा खंडाळे यांनी ‘विसंगत अन्नग्रहण’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णाचे प्रा. संतोष शर्मा यांनी ‘योगाभ्यासद्वारे विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

   केवळ व्याख्यानेच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाचा संदेश दिला. श्रमसंस्काराद्वारे साईनाथ विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता करण्यात आली. पथनाट्य आणि रॅलीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

                         सात दिवसांच्या या कार्यकाळात स्वयंसेवकांनी आपल्या कार्यातून गावकऱ्यांची मने जिंकली, मात्र निरोप घेताना स्वयंसेवकांचे डोळे पाणावले होते.

        समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चानकुमार खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश हिंगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर आणि उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभले.

                          यावेळी ग्रामपंचायत सरपंच शैलेश चटके, उपसरपंच सुषमा उरकुडे, साईनाथ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुमा मानुसमारे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चानकुमार खोब्रागडे यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.से.यो. विभागीय समन्वयक डॉ. कुलदिप आर. गोंड, कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार आणि डॉ. निखील देशमुख यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रा. सिद्धार्थ कांबळे आणि शिक्षकेतर कर्मचारी शशिकला पारधी, हनुमंतू ठंबारे, दशरथ कामतवार, रुचिता टोकलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

     वरिष्ठ स्वयंसेवक इजाज शेख, मुबारक शेख, भैरव दिवसे, दर्शन मेश्राम, रोशन चौधरी, साहिल गायकवाड, गौरव झाडे, अनिकेत टेकाम, रोहित चिवंडे, आकाश मडावी, आनंद इंगोले, दिपक सिन्हा, शालिनी निर्मलकर यांनी चोख व्यवस्था सांभाळली.

       दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here