Home
Home चंद्रपूर न्यू आझाद गोल्डन योग नृत्य महिला क्रिकेट संघ विजेता.

न्यू आझाद गोल्डन योग नृत्य महिला क्रिकेट संघ विजेता.

0
165

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(वि. प्र.) : जागतिक महिला दिनानिमित्य व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मराठा चारिटेबल ट्रस्ट तर्फे टिकी टाका टर्फ, बायपास रोड चंद्रपूर येथे घेण्यात आलेल्या महिलांचा क्रिकेट स्पर्धेत आझाद गार्डन महिला क्रिकेट टीम ने विजेतेपद मिळविले.

      इराई महिला क्रिकेट टीम सोबत झालेल्या अत्यंत चुरशीचा सामन्यात इराई टीम ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले.

    तर प्रथम फलंदाजी करत आझाद गार्डन टीम ने सात षटकात 29 धावा केल्या.

   जिद्द, परिश्रम, आणि संघ एकता तसेच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचा जोरावर आझाद टीम नी इराई टीम ला 7 षटकात 27 धावावर रोखून 2 धावांनी विजय मिळविला.
 खासदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला.

आझाद टीम च्या श्वेता आईंचवार व अनुषा यांना उत्कृष्ट खेडाळू म्हणून सन्मानित करण्यात आले.

    आझाद गार्डन महिला टीम च्या कर्णधार अनुषा कलपेल्ली व टीम सदस्य संगीता कामडी, श्वेता आईंचवार,अर्चना खेकारे, माधुरी सोनटक्के, रचना सहारे, रुपाली महाकाळकर,टीना निकोडे, भाग्यश्री, अभिशालिनी तसेच टीम कोच प्रदीप महाकाळकर सहभागी होते.

          तसेच आझाद गार्डन टीम चे मार्गदर्शक, धनंजय तावाडे, प्रकाश गुंटेवार, प्रवीण खेकारे, नरेश महाकाळकर, मंगेश बोकडे उपस्थित राहून टीम चा उत्साह वाढविला, व टीम सदस्यांचे अभिनंदन केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here