Home
Home चंद्रपूर जल व वायू प्रदूषण त्वरित थांबवा, कामगारांच्या मागण्या तातडीने सोडवा. आ....

जल व वायू प्रदूषण त्वरित थांबवा, कामगारांच्या मागण्या तातडीने सोडवा. आ. सुधीर मुनगंटीवार यांचा चमन मेटॅलिक्स प्रा. लि. ताडाळीला स्पष्ट निर्देश. जल-वायू प्रदूषणाबाबत १६ एप्रिलला पर्यावरण मंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक. आ.मुनगंटीवार यांचे स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचे आणि अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीच्या मदतीचे आदेश

0
100

HELLO CHANDA NEWS

          चंद्रपूर,(का. प्र.)- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चमन मेटॅलिक्स प्रा. लि., ताडाळीच्या अधिकाऱ्यांसोबत २७ मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आढावा बैठकीत त्यांनी कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणाच्या गंभीर परिणामांबाबत आणि कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

  जल व वायू प्रदूषण त्वरित थांबवा, तसेच कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडवा, असे स्पष्ट निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चमन मेटॅलिक्स प्रा. लि., ताडाळी या कंपनीला दिले. तसेच संबंधित सर्व प्रश्नांवर त्वरित निर्णय घेऊन नागरिक व कामगारांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, अनिल डोंगरे, किरण अलोने, विकी लाडसे, रेखा जुनघरे तसेच चमन कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

     बैठकीत चमन कंपनीमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करण्यात आला. कंपनीमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नदी व नाल्यांचे पाणी प्रदूषित होत असून, धुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

          यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आली.

         या पार्श्वभूमीवर येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

  तसेच, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार कार्यरत असून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जात नसल्याची बाबही मांडण्यात आली.

यासंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आगामी दौऱ्यादरम्यान कंपनीतील सर्व कामगारांची यादी तपासण्यात येणार असून स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

कासवटे कुटुंबियांना १० लक्ष रुपयांची मदत करा.

     चमन मेटॅलिक्स प्रा. लि. अंतर्गत वीनस या खाजगी कंपनीत कार्यरत असलेले चंद्रकांत कासवटे यांचा नोव्हेंबर २०२५ मध्ये अपघाती मृत्यू झाल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

अपघातानंतर त्यांच्यावर डॉ. मेहरा हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले होते.

  मात्र, अद्याप कंपनीकडून त्यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनीला स्पष्ट निर्देश देत संबंधित रुग्णालयायातील संपूर्ण बिलाची रक्कम तसेच किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ कासवटे कुटुंबास देण्याचे आदेश दिले.

 कामगारांच्या प्रश्नांसाठी कायम पुढाकार.

    कामगारांच्या हक्कांसाठी आणि औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नांवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. यापूर्वीही त्यांनी विधानसभेत हा मुद्दा ठामपणे मांडत कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

  पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका घेतली असून आताही प्रदूषण रोखणे आणि कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ते ठामपणे प्रयत्नशील आहेत.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here