Home
Home चंद्रपूर नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे शांतता समितीने केले स्वागत – सत्कार!

नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे शांतता समितीने केले स्वागत – सत्कार!

0
119

HELLO CHANDA NEWS

                  चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर येथे नुकतेच जिल्हाधिकारी पदाचे कार्यभार सांभाळणाऱ्या व चंद्रपूर जिल्ह्याचे प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून बहुमान प्राप्त केलेल्या वसुमना पंत यांची 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समिती सदस्य यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत – सत्कार केले.

 

        चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली यांनी शाल देऊन तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री,रामनगर शांतता समिती सदस्य ताजुद्दीन शेख, रामनगर शांतता समिती सदस्य गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत – सत्कार केले व त्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ही दिल्या. 

           तसेच चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाकडून संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदानंद खत्री सोबत संघटनेचे सचिव विवेक पत्तीवार यांनी स्वागत केले.

     या प्रसंगी कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांचे साप्ताहिक कलम मांगे इन्साफ या वृत्तपत्राचे विमोचन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here