HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) : वामन दादा कर्डक फार सुंदर लिहतात ते म्हणतात की, उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे……
ही केवळ काव्यपंक्ती नाही, तर शतकानुशतके दडपलेल्या, शोषित,पिढीत आणि वंचित समाजाच्या वेदनांना मिळालेला मुक्तीचा आवाज आहे…. पुढे वामन दादा म्हणतात की,
जखडबंद पायातील साखळदंड,
तडातड तुटले तू ठोकताच दंड…
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे……
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांनी दिलेलं संविधान हे प्रत्येकासाठी समानतेचं शस्त्र आहे….
न्याय मिळवण्याचं साधन आहे.. स्वाभिमानाने उभं राहण्याची ताकद आहे, ऊर्जा आहे.आज आपण मुक्त आहोत, शिक्षण घेतो, आपले हक्क मागतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांच, संघर्षाचं फळ आहे.पण या स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा आपणही त्यांच्या विचारांचा स्वीकार करून समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करु…रमेश दादा बुरबुरे फार सुंदर लिहतात….
जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते…
रक्षा तुझी न माझी हे संविधान करते…..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर प्रत्येकासाठी समान आहे…. ते ना जात पाहतं, ना धर्म, ते फक्त माणूस पाहतं…परंतु आज वास्तविक पाहता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाती-धर्मामध्ये भेदभाव दिसतो, अन्याय आणि विषमता विविध स्वरूपात दिसून येते…..म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणात ठेवण्यापुरते नसून, ते कृतीत आणणे गरजेचे आहे…शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी पिणार ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही….म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा…. असा शिक्षणाचा मूलमंत्र तुम्हा-आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे…
विश्वरत्न , बोधिसत्व, प्रज्ञासूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेपंतीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन…..
























