================================
चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची चंद्रपूर कार्यालयात विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक एडवोकेट श्री विजयराव मोगरे यांच्या नेतृत्वात, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ संजय बेले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ नामदेवराव वरभे, महिला अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे, चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री अभय घटे, श्री मनीष खनके जेष्ठ विधितज्ञ् एड. वासुदेवराव खेळकर, एड टिपले, एड. अनिरुद्ध टिकले, प्रा डॉ सुभाष गिरडे, डॉ अभय बुटले, एड प्रवीण पिसे, दिक्षात बेले यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान अनेक विषयावर चर्चा झाली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निर्वांचन क्षेत्रात तेली समाज बहू संख्य प्रमाणात आहे परंतु स्वातंत्र्य नंतरही तेली समाजाचा पाहिजे तसा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास झालेला नाही. याकरिता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विदर्भ तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाकारिता सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व बहुसंख्य असलेल्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी व शिष्टमंडळाला दिले. यावेळी तेली समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















