=================================
महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद!
कल्याण(वि. फे.वृ .से.):कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्याने महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी २७ गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते.
या कर्मचाऱ्यांची नुकतीच भेट घेऊन याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसमवेत लवकरच बैठकीचे आयोजन करून यावर तोडगा काढण्यात येईल. असे त्यांना आश्वासन दिले होते.
त्याबाबत आज लगेचच मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करून त्यांना महापालिकेच्या नियमानुसार वेतन देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले. तसेच यासाठीची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना केल्या. आमच्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार. यामुळे सुमारे ५०० सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या आयुक्त इंदुरानी जाखड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















