बुलंद करणारा लोकसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
माजी आमदार उध्दवराव शिंगाडे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारा लोकसेवक काळाच्या पडदयाआड गेल्याची शोक भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
अतिशय साधी राहणी, सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या आपुलकीचा माणूस म्हणून मिसळणारा आमदार म्हणून उध्दवराव शिंगाडे यांनी लोकप्रियता मिळविली होती. आमदार म्हणून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी, दीन, दुर्बल, शोषीतांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारे उध्दवराव विधानसभेतील सहकारी म्हणून मी अनुभवले आहे. अतिशय गरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या उध्दवरावांनी मोठा संघर्ष करत आमदार म्हणून स्वतःला सिध्द केले. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर या दुःखातुन सावरण्याचे बळ त्यांच्या कुटूंबियांना देवो व त्यांच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793