=================================
*वरोरा*
==================================
शिक्षण क्षेत्रात विभागात खळबळ उडवून टाकणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली होती, शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती व या दरम्यान २० ऑगस्ट रोजी बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले होते, संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली तर ज्या शाळेत अत्याचार झाले, त्या शाळेचीही आंदोलकांनी तोडफोड केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच वरोरा येथील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला दोन शिक्षकांनी शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून वरोरा पोलीस स्टेशनं येथे आरोपी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, दरम्यान या घटनेच्या विरोधात शाळेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले असल्याने सगळीकडे वातावरण पेटले असल्याचे दिसत आहे.
मुलीं व महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गेली।
वरोरा येथील एका नामवंत शाळेत शिकत असलेल्या 16 वर्षीय मुलीवर त्याच शाळेच्या बेलेकर व पिरके या दोन शिक्षकांनी छेडखानी केल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनं येथे केली असता आरोपी शिक्षकांवर कलम 354 व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याची माहिती असून आरोपी शिक्षक फरार झाले असल्याची माहिती समोर येत आहे। ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























