Home
Home चंद्रपूर *अभितीत वंजारी यांची चंद्रपुर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ति.*

*अभितीत वंजारी यांची चंद्रपुर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ति.*

0
76

================================ 

*चंद्रपूर*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
चे दि. ३० सप्टेंबर, २०२४ च्या पत्रानुसार आमदार अभिजीत वंजारी यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

लवकरच राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहिर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील ईच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झालेले जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची विधानसभानिहाय यादी पक्षनिरीक्षकाकडे पाठविण्यात आली आहे.

तसेच सर्व ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम दि. १ ते ८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान जिल्हास्तरावर घेण्यात यावा असे निर्देश महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलाजी व प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलेले आहेत. तसेच प्रांताध्यक्ष महोदयांच्या मान्यतेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी अभितीत वंजारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व या संबंधीचे पत्र चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष यांनाही देण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी
जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांसोबत संपर्क साधून दि. १ ते ८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान जिल्हास्तरावर ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करावा. असेही पत्राद्वारे कळविण्यात आले असून प्रदेश कार्यालयाकडून पाठविलेल्या आपल्या जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांसोबत संपर्क साधुन त्यांना मुलाखतींसाठी उपस्थित राहण्याबाबत देखिल आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे असे ही पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.तसेच निरीक्षकांनी आपल्याला नियुक्त केलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांसोबत संपर्क साधून जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घ्यावा व मुलाखती घेतलेल्या उमेदवारांची माहिती प्रपत्रामध्ये भरून दि. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत (गोपनीय अहवाल) प्रदेश कार्यालयाकडे सादर करावा. असे देखील पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. हे मात्र विशेष.     ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===============================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here