============================
*चंद्रपूर* ============================ चंद्रपूर मधील ओमॅट वेस्ट लिमिटेड ताडाळी या कंपनी मध्ये श्यामसुंदर नथुजी ठेंगणे या कामगारांचा किलन वरती काम करत असतांनी 50 फूट वरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला असता
स्वराज्य शेतकरी संघटनेच्या व इतर सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने आंदोलन करून कंपनी कडून सर्व प्रकारची मदत करायला भाग पाडले व उर्वरित शासकीय कागदपत्र जमा करून व उर्वरित मदत द्यायचे ठरले असता
कंपनी अधिकारी आता टाळाटाळ करत असल्यामुळे मृतक कामगारांची पत्नी श्रीमती, आशाताई श्यामसुंदर ठेंगणे यांना न्याय मिळवून देण्याकरिता
या कंपनी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, मुजोरीमुळे कंपनी मध्ये आज पर्यंत शेकडो कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहेत
तसेच काही दिवसा अगोदर अजय राम नामक राहणार ( बिहार राज्य ) या कामगारांचा कामा वरती काम असतांना दुर्देवी मृत्यू झाला असता कंपनी अधिकाऱ्यांनी कामगारांचा मृत्यू देह त्यांच्या राहत्या गावा कडे ( बिहार ) ला कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर मदत व कंपनजेशन न देता नेऊन दिला
आज पर्यंत या कंपनी मध्ये शेकडो कामगारांना आपला कंपनी अधिकार्याच्या चुकीच्या धोरणामुळे, व सुरक्षेतेचे कुठलेही उपक्रम न वापरायला न देता जीव गमवावा लागला आहेत
तरी प्रशासनाचे कडून कुठल्याही प्रकारचे दबाव दिसत नाही त्यामुळे
.lमा. सुधाकर गोविंदरावजी अडबाले साहेब ( आमदार, विधानपरिषद नागपूर विभाग ) यांना पीडितांना घेऊन स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भेटून पत्र देऊन विषयाचे गांभीर्य समजून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद मध्ये विषय धरून लावावा व कंपनी विरोधात कामगारांचे होणारे शोषण थांबवण्याकरिता पाऊल उचलावे व या समोर कामगारांना आपला जीव गमवावा लागणार नाही करिता मृतक कामगारांच्या कुटुंबियाना न्याय मिळवून द्यावा ही विंनती करण्यात आली*
=============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*