Home
Home चंद्रपूर *प्लॅन इंडिया इम्पॅक्ट अवॉर्ड्स ने चंद्रपूर बाल कल्याण समिती सन्मानित*

*प्लॅन इंडिया इम्पॅक्ट अवॉर्ड्स ने चंद्रपूर बाल कल्याण समिती सन्मानित*

0
98

=================================

*प्लॅन इंडिया इम्पॅक्ट अवॉर्ड्स ने चंद्रपूर बाल कल्याण समिती सन्मानित*                        ===============================                              *चंद्रपूर*           ==============================

प्लॅन इंडिया इम्पॅक्ट अवॉर्ड्स हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जो संपूर्ण भारतातील समुदाय विकास चॅम्पियन्सच्या कार्याला मान्यता देतो. ज्या व्यक्तींनी आणि संस्थांनी त्यांच्या समुदायात बदल घडवला आहे त्यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेला या पुरस्काराने ओळखले जाते.
प्लॅन इंडिया इम्पॅक्ट, दिल्ली यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या बाल कल्याण समिती पैकी चंद्रपूर बाल कल्याण समिती ला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय पुरस्काराचा मान प्राप्त झाला आहे. या अवॉर्ड नॉमिनेशन करिता पुणे आयुक्तालय महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत माहिती देण्यांत आली होती. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. क्षमा विजय बासरकर यांनी चंद्रपूर बाल कल्याण समिती करिता फॉर्म भरला आणि त्यात 27000 नॉमिनेशन वेगवेगळ्या भागातून आणि विभागामधून आले होते. त्यात त्यांनी 75 सहभागीना निवडले होते. त्यात महाराष्ट्र मधून चंद्रपूर येथील बाल कल्याण समिती यांना बेस्ट बाल कल्याण समिती म्हणून निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये 10,000/- असे पारितोषिक असून हा पुरस्कार चंद्रपूर बाल कल्याण समिती ला मिळाला आहे. स्थानिक पातळीवर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य मा.ॲड. संजय सेंगर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा उपयोग करून चंद्रपूर बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. क्षमा विजय बासरकर यांच्या व समिती सदस्य यांच्या संकल्पनेतून बाल स्नेही बाल कल्याण समिती तयार कऱण्यात आली. जेणेकरून लैंगिक अत्याचारातुन आलेल्या पिडीत बालिका बालके, अनाथ व हरविलेल्या बालकांना बाल कल्याण समिती मध्ये आल्यावर सुरक्षित व आनंदी वाटेल.
महिला व बाल विकास विभागातील सर्व मान्यवर वरिष्ठ सहकारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी. सी. व बाल कल्याण समिती सदस्य ॲड. अमृता वाघ, डॉ.ज्योस्त्ना मोहितकर, वनिता गजानन घुमे यांनी या प्रक्रियेत खूप सहकार्य केले. तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर चाइल्ड लाईन, पोलिस विभाग, रेल्वे विभाग, रुदय संस्था श्री काशिनाथ देवगडे, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे , सगळे बालगृह, बाल न्याय मंडळ, विधी सेवा प्राधिकरण, सखी वन स्टॉप सेंटर सगळ्यांची चांगली साथ लाभली.       ==============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ===============================                    कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here