Home
Home Breaking News मोटारसायकल चोराच्या रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

मोटारसायकल चोराच्या रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

0
213

==================================

मोटारसायकल चोराच्या रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

चोरीच्या 09 मोटारसायकल जप्त      

दि. 21/01/2025.

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसापासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीस प्रतिबंध करून चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावेत बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांनी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी थी. अमिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. असिफराजा शेख यांना रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटारसायकल चोरी करणारे चोरांबाबत गोपनीय माहिती काढून चोरीचे गुन्हयांची उकल करण्याबाबत आदेशीत केले होते.त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर येथे दाखल अपराध क्र. 1198/2024 कलम 303(2) बी. एन. एस. मधील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा तसेच अन्य चोरीचे बरेच गुन्हे हे कपील प्रभू मेश्राम, वय- 33 वर्षे, रा. फुकटनगर, परिवर्तन चौक, राजीव गांधी नगर, चंद्रपूर गाने केला आहे. त्यानुमार त्याचा शोध घेत असताना तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. त्यानुसार पोलीसांनी सतत त्याच्या मागावार राहून त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्यास दि. 21/01/2025 रोजी ताब्यात घेऊन अटक केली. त्याचेकडे विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबूली देऊन सदर गुन्ह्यासोबत चंद्रपूर शहर, भद्रावती, रामनगर ईत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा कंपनीची प्लेझर मोपेड गाडी क्र. एम.एच. 34, व्ही. 6289 हीचेसोबत अन्य 08 अशा एकूण 09 मोटारसायकल एकूण 4,08,000/- रूपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. त्यासंदर्भात खालील गुन्हे दाखल असून ते उघडकीस आले असून अन्य मोटारसायकल संदर्भात दाखल गुन्ह्याबाबत माहिती घेऊन आरोपीस गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची तजवीज ठेवली आहे.

1) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1182/2024 कलम 303 (2) ना.न्या. सं.

2) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1186/2024 कलम 303(2) ना. न्या. सं.

3) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्र. 1198/2024 कलम 303 (2) भा.न्या. सं.

4) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अपराध क्र. 1159/2024 कलम 303 (2) भा.न्या. सं.

5) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अपराध क्र. 1026/2024 कलम 303(2) भा.न्या. सं.वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमका सुदर्शन व मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार डेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलबार, ब्युटी साखरे यांनी केली आहे.       ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे                    *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*                                       *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here