Home
Home चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी “मीट द प्रेस” कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांशी साधला...

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी “मीट द प्रेस” कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांशी साधला संवाद!

0
86

=============================

                       चंद्रपूर 

               हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रकारांशी मुक्तपणे संवाद साधण्यासाठी “मीट द प्रेस” या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार भवन च्या कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर तसेच चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रवीण बतकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले.जिल्हाधिकारी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाट लवकर सुरू करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहे, तसेच जी रेती जप्त करण्यात आली आहे ते घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कशी देता येईल याकरिता सुद्धा विशेष पावले उचलण्यात येईल.

मराठी बोलीभाषा शिकण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मराठी भाषा शिकताना पाठ्यपुस्तके, चित्रपट, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मराठी शिकण्याचा मी विशेष प्रयत्न केला व नाशिक येथे तहसीलदार या पदावर कार्यरत असताना मराठी भाषेत संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. व आज मला मराठी बोलताही येते व समजते ही असे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.त्यांच्या आय. ए. एस. अटेम्प्ट बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की मी बी.टेक. व कम्प्युटर सायन्स केल्यानंतर जनसामान्याशी संवाद साधण्याचे व जनहितार्थ कार्य करण्याचे माझे संकल्प असल्याने मी आय.ए.एस. ची परीक्षा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये उत्तीर्ण केली.मराठी शिकताना कोणते एखादे विशेष प्रसंग आठवते असे विचारले असता त्यांनी सांगितले आचार यास मराठी भाषेत लोणचं म्हणतात हे मला तेव्हा माहीत नव्हते जेव्हा मी आचार आणा असे सांगितले तर त्याऐवजी आचारीच माझ्यासमोर आले. असा गमतीदार प्रसंग ही त्यांनी यावेळेस सांगितला.भोगवटदार वर्ग 2 ची जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये करण्यासाठी सुद्धा आमचे विशेष प्रयत्न सुरू असून यासाठी आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे कॅम्पचे आयोजन करावे का? याबाबत सुद्धा निर्णय घेता येईल असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नॉन डायव्हर्टेड प्लॉट खरेदी करू नये तसेच नॉन डायव्हर्टेड प्लॉटची विक्री किंवा खरेदी नोटरीवर करणे हे नियमबाह्य आहे.
नॉन डायव्हर्टेड प्लाट खरेदी विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल. असे देखील त्यांनी सांगितले.

पोलीस विभागाच्या कार्यप्रणाली बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना सुद्धा धडा शिकवला जात आहे. चंद्रपूर पोलीस विभागाचे काम समाधानकारक आहे अशा आशयाचे वक्तव्य जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले हे मात्र विशेष.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून याचे नावलौकिक आहे व हे नावलौकिक कायम ठेवण्यासाठी तुम्हा आम्हास विशेष प्रयत्न करत राहावे लागणार आहे, व चंद्रपूर जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याची आपली जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडू या…. असे देखील आवाहन केले.

मीट द प्रेस हा कार्यक्रम साडेपाच वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत सुरू होता.

मीट द प्रेस या कार्यक्रमात सय्यद रमजान अली, अमित वेल्हेकर, सय्यद मजहर अली, राजेश निचकोल, जयपाल गेडाम, दिनेश एकवणकर,
संतोष यंदलवार, गणेश, अनुप बेले, देवानंद साखरकर, सुनील देवांगण, वैभव, राजू अलोने, शैलेश गणवीर, प्रकाश देवतळे, अजय दुबे, संजय तिवारी, प्रशांत चहांदे, धनंजय साखरकर, सुनील बोबडे, रोशन वाकडे,राममिलन सोनकर, आशिष अंबाडे, विकास मोरे, अनिल ठाकरे, संजय बारहाते, सुनील देवांगण, संजय तुमराम, रमेश कालेपल्ली, नेहा शंकर, तेजराज भगत, सुदेश वर्मा, श्रीनिवास, करण कुलगुरी, मनोहर दोतपल्ली, पंकज मोहरीर, योगेश चिंधलोरे, खुशाल हांडे, प्रकाश देवगडे, कमलेश सातपुते, अनुप यादव, सह अनेक पत्रकार मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे संघटन सचिव बाळूभाऊ रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रवीण बतकी यांनी केले.          ===========================         *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ===========================

*हॅलो चांदा न्यूज,                        मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here