Home
Home चंद्रपूर नांदेडमध्ये महिलेचा हुंड्यासाठी छळ! पती सय्यद नईम सह नऊ जणांवर गुन्हा दाखल.

नांदेडमध्ये महिलेचा हुंड्यासाठी छळ! पती सय्यद नईम सह नऊ जणांवर गुन्हा दाखल.

0
93

=================================

                    हॅलो चांदा न्युज

नांदेड(जि.प्र.): नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            माहीन फातेमा सय्यद नईम यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सय्यद नईम हे ‘जील कन्सल्टन्सी पिर बुऱ्हाण नगर चे मालक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहीन फातेमा यांचा विवाह सय्यद नईम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपासून सय्यद नईम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माहीन यांना दोन लाख रुपये हुंडा म्हणून आणण्यासाठी तगादा लावला होता. या मागणीसाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी माहीन यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि उपाशी ठेवले तसेच, त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.            या प्रकरणी पोलिसांनी ‘जील कन्सल्टन्सी’चे मालक सय्यद नईम (पती), जमीला बेगम (सास), सय्यद नदीम (देवर), समरीन बेगम (नणंद), सनाबेगम (नणंद), इमरान पाशा (नंदोई), सय्यद माजिद (नंदोई), सय्यद महेबुब (चाचा) आणि सय्यद पाशा (चाचा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी 19 मे 2025 रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम प्रमाणे 498A,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून ही गुन्ह्याची घटना 30/12/2022 ते 28/04/2024 च्या दरम्यान घटल्याची तक्रारीची नोंद फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीप्रमाणे, 19/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड करत आहेत.   

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here