Home
Home चंद्रपूर आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते विनामूल्य रेती वाटपाचे शुभारंभ.

आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते विनामूल्य रेती वाटपाचे शुभारंभ.

0
69

=================================

                      हॅलो चांदा न्युज

कोरपणा(ता.प्र.): कोरपणा तालुक्यातील भोयगाव, सातरी, नलफडी व धाबा
येथीलघरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि घरांचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी
दिनांक 24 मे 2025 रोजी
राजुरा विधानसभेतील भोयगांव, सातरी, नलफडी आणि धाबा येथील रेती घाटांवर उपस्थित राहून लाभार्थ्यांना विनामूल्य रेती वितरणाचे शुभारंभ आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

लोककल्याणकारी महायुती सरकारच्या या हितावह निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती आता विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्याकरिता राजुरा विधानसभेतील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या अधिकृत रेती घाटावरून मिळणाऱ्या विनामूल्य रेती वितरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे. स्वतःचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल योजना ही केवळ चार भिंती पुरती मर्यादित नसून, ती कुटुंबाचे भविष्य घडवते. आपल्या महायुती सरकारच्या या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून, गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, यामुळे घरकुलांच्या बांधकामाला गती मिळेल अशी आशा देखील याप्रसंगी व्यक्त केली आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, भोयगांव घाटावर तहसीलदार पल्लवी आखरे, संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, नायब तहसीलदार चिडे, सातरी व नलफडी घाटावर तहसीलदार ओमप्रकाश गोंड, धाबा घाटावर संवर्ग विकास अधिकारी अरुण चनफणे, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेठे, नायब तहसीलदार नागापुरे, गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, सुहास माडुरवार, स्वप्नील अनमुलवार, भानेश येग्गेवार, इंद्रपाल धुडसे, निलेश पुलगमकर, आशिष ताजने, भोयगांवच्या सरपंचा सौ. शालिनी गोरे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, सातरीच्या सरपंचा सौ. पद्मा वाघमारे, नलफडीचे सरपंच अमित टेकाम, धाबाच्या सरपंचा नंदा घोगरे, पुरुषोत्तम गावंडे, भाऊराव बोबडे, बाळनाथ वडस्कर, विजय पारसिवे, यशोधरा निरांजने, भिमराव साळवे, भीमराव पाला, श्रीकृष्ण गोरे, आशिष चांदेकर, राजू निमकर, रवी बोढे, नवनाथ पिंगे, भाऊराव चंदनखेडे, विनोद भोंगळे, मनोहर निमकर, बंडू जुनघरी, विठ्ठल उपरे, राहुल पायघन, संभाजी निखाडे, प्रणय अतकरे, अशोक झाडे, निखील भोंगळे, विजया गेडाम, सचिन भोयर, अभिजित कोंडावार, अनुप मून, निशांत मून, प्रदीप पाला, गुलाब मंदे, लक्ष्मीकांत मासीरकर, ग्रामसेवक मंजुषा ढोरे,हिराचंद कंदीकुरवार, स्वाती वडपल्लीवार, रवी पावडे, कोमल फरकाडे, संजय येलमुले, अरुणा जांभुळकर, श्री. कोटनाके, रामकृष्ण सांगडे, संजय येलमुले, राजेंद्र गोहणे, विठ्ठल चणकापुरे, अमित कुरंजेकर, गजानन घुगे, निलिमा कंदीकुरवार, अनिसा शेख, नीलकंठ लखमापुरे, मनीषा मडावी, सुरेखा श्रीकोंडावार, मनीषा दुर्योधन, कलावती पुप्पलवार, सुनिता आत्राम, शिथिल लोणारे, गणेश मेरुगवार, रमेश डिंगलवार, राकेश साकलवार, वैभव बोनगीरवार, विलास ढोडरे, पिसाजी कुळमेथे, मनोज वनकर, संतोष बंडावार आदिंची ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================               *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here