Home
Home चंद्रपूर व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदच्या आवाहनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाततील बैठकीत पुलाचे काम लवकरच करण्याची ग्वाही!

व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदच्या आवाहनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाततील बैठकीत पुलाचे काम लवकरच करण्याची ग्वाही!

0
85

================================

लोखंडी पटरी पार करून जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात साचले चिखल, संबंधितांनी घ्यावी याची त्वरित दखल!

                         घुग्घूस

                   हॅलो चांदा न्युज

घुग्घूस(वि.प्र.): घुग्घूस हा शहर दोन भागात विभागलेला असून एकीकडे डब्ल्यू सी एल कालोनी तर 1 दुसरीकडे घुग्घूस बस्ती आहे व मधात रेल्वे लाइन असून नागरिकांना येण्या जाण्यासाठी लोखंडी पूल हा एकमात्र पर्याय होता. हा लोखंडी पूल क्षतीग्रस्त झाल्याने लोखंडी पुलाचा हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ये – जा करण्यासाठी आपले जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या पटरी वरून जाणे येणे करावे लागत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना यादरम्यान घडू शकते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण की हा लोखंडी पुलिया बंद असल्याने व सध्या पाऊस येत असल्याने लोखंडी पटरी पार करून जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे.

घुग्गुस येथील लोखंडी पूल चा हा मार्ग दुरुस्त करून लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी येथील व्यापारी संघटने कडून एका बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली होती. व या बैठकीत असे ठरविण्यात आले होते की लवकरात लवकर या लोखंडी पुलचे काम सुरू न केल्यास 26 मे 2025 पासून घुग्गुस सर्व दुकाने बंद ठेवण्यात येईल.असे आवाहन देखील करण्यात आले होते व ही बातमी कलम मांगे इन्साफ या पोर्टलमध्ये गुरुवार रोजी प्रकाशित ही करण्यात आली होती व ती बातमी हिंदीमध्ये
“पुलिया का काम अतिशीघ्र शुरू करे अन्यथा आंदोलन”।
या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आली होती, हे मात्र विशेष!

ही बाब प्रशासनाला राजकीय नेत्यांना कळताच त्यांनी ॲक्शन मोडवर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली. 

या बैठकीत चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूर विधानसभा चे आमदार किशोर जोरगेवार वे. को. ली. चे अधिकारी, घुग्घूस शहराचे चे व्यापारी यांची प्रामुख्याने उपस्थित होती व ही बैठक वीसकलमी भवनमध्ये पार पडली. या बैठकीत वे को ली च्या अधिकाऱ्याना सागण्यात आले की घुग्घूस मध्ये जाऊन लोखंडी पुलिया ची पाहणी करून व्यापारी सामोर जाऊन तुम्ही कधी परंत काम चालू करू शकता ते स्पष्टपणे सांगावे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे दिनांक २४/०५/२०२५
W C L चे इंजिनियर लोखंडी पुलाची पाहणी करण्यासाठी आले. आणि त्यांनी उपस्थिताना असे कळविले की येत्या २०/०६/२०२५ पर्यंत आम्ही काम चालू करू त्यांच्या या बोलण्यावर उपस्थित मान्यवरांनी असे सांगितले की आपल्या म्हणण्यापणाप्रमाणे काम सुरू न झाल्यास किंवा सुरू करण्यात न आल्यास घुग्घूस शहराची जनता व व्यापारी आपले प्रतिष्ठान बंद करून त्रीव आदोलन करतील. तसेच यापूर्वी व्यापारी वर्गांनी घेतलेल्या बैठकीत असे ठरविले होते की
येत्या २६/०५/ २०२५ पासून घुग्घूस मध्ये बेमुद्दत बंद चे आंदोलन करण्यात येईल. परंतु संबंधित विभागाने व प्रशासनाने काम लवकरात लवकर करण्याची हमी दिल्याने त्यांनी हा आंदोलन आता करण्यात येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले असून काम सुरू करण्याचा दिलेला शब्द संबंधित विभागाने प्रशासनाने न पडल्यास व्यापारी संघटनेच्या व गावकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील केला आहे हे मात्र विशेष.

विशेष म्हणजे लोखंडी पुलाचा मार्ग बंद असल्यामुळे व पाऊस आल्याने रेल्वे पटरी वरून जाणाऱ्या मार्गात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने या खालच्या मार्गावरून जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागत आहे त्यामुळे काही नागरिक तर बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या मार्गाचाही वापर करत आहे त्यामुळे कोणतीही जीवित हानी वित्तहानी होणार नाही याची संबंधितांकडून दक्षता घेऊन लवकरात लवकर हा लोखंडी पुलाचा मार्ग दुरुस्त करण्यात यावा असे देखील बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे, हे मात्र विशेष!       =============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here